राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचा सहभाग
![]()
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचा सहभाग
उरुळी कांचन: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन ,जिल्हा परिषद आरोग्य विभाग व उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचनद्वारा विविध ठिकाणी पल्स पोलिओ बुध वर पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. येथे डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे पाच वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ चे डोसेस देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ,अपंग सेवक डॉ.रवींद्र भोळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सूर्यकांत हनुमंते, सौरभ पवार , गणेश सहारे हे आरोग्य सेवक, स्मिता सचिन चव्हाण आशा वर्कर, मीरा लिंबोने अंगणवाडी शिक्षिका,मुक्ता डोके मदतनीस यांनी लसीकरणाला सहकार्य केले. याप्रसंगी प्रतिनिधींजवळ आपले मत व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की पल्स पोलिओ मोहीम या राष्ट्रीय कार्यक्रमात 1995 पासून या मोहिमेला सहकार्य करीत आहोत, उरुळी कांचन येथे प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे डॉ. रवींद्र भोळे पल्स पोलिओ बूथ यासाठी चालविला जातो. पोलिओ मायलेटीस या संसर्गजन्य विषाणू मुळे अर्धांगवायू ,अपंगत्व येऊ शकते. यासाठी पोलिओ निर्मूलनाचे उच्चाटन करण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पाच वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ मोहीम अत्यंत उपयुक्त आहे. या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा पाच वर्षाखालील बालकांनी लाभ घ्यावा.

