श्रीमती मंगलबाई महाजन यांचे निधन — उद्या सकाळी ११ वाजता कळमसरे येथून राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा —
![]()
श्रीमती मंगलबाई महाजन यांचे निधन
— उद्या सकाळी कळमसरे येथून राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा —
अमळनेर प्रतिनिधी :
कळमसरे (ता. अमळनेर) येथील आदरणीय, प्रेमळ, धर्माभिमानी आणि सर्वांच्या आपुलकीने वागणाऱ्या श्रीमती मंगलबाई शांताराम महाजन यांचे दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी शनिवार, सायंकाळी 7.15 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाजन परिवारावर तसेच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीमती मंगलबाई महाजन या आपल्या सुसंस्कृत, विनम्र आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळविणाऱ्या व्यक्तिमत्व होत्या. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ आयुष्याने आणि कुटुंबवत्सल वृत्तीने त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला होता.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी रविवारी सकाळी 11.00 वाजता त्यांच्या राहत्या घरून, कळमसरे ता. अमळनेर येथून निघेल. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो, हीच सर्वांच्या मनःपूर्वक प्रार्थना. 🙏
शोकाकुल परिवार :
श्री वासुदेव भाऊलाल महाजन
श्री मुरलीधर राजाराम महाजन
श्री संजीव भाऊलाल महाजन
श्री भरत राजाराम महाजन
समस्त नेरकर परिवार, कळमसरे 💐
(मराठी लाईव्ह न्युज परिवार नेरकर परिवाराच्या दुःखात मनःपूर्वक सहभागी आहे.)

