के.एल.पोंदा.हायस्कूल येथे काळजात मराठी अभिजात मराठी विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न !
1 min read

के.एल.पोंदा.हायस्कूल येथे काळजात मराठी अभिजात मराठी विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न !

Loading

के.एल.पोंदा.हायस्कूल येथे
काळजात मराठी अभिजात मराठी विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न !

अमळनेर प्रतिनिधी
शाळेचे मुख्याध्यापक मा.सोपान इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.त्यांनी या उपक्रमा बद्दल गौरवोद्गार काढले. उपमुख्याध्यापिका मा.सौ.रसिका घागस मॅडम यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.पर्यवेक्षक मा.सुनिल मोरे सर, पर्यवेक्षिका मा. सौ.मनिषा पटेल मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन,शाळेच्या ,उपक्रमशील शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले.गेल्या अनेक वर्षांपासून त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता फुलते कशी!काव्य लेखन, सादरीकरण यांचे मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन आणि श्रवण कौशल्याचा विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे. हा या विद्यार्थी कवी संमेलनाचा मुख्य हेतू होता.या संमेलनामुळे नवोदित कवींच्या विचारांची देवाण घेवाण झाली.आणि त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि वक्तृत्व कौशल्याला योग्य वाव मिळाला.
या कवी संमेलनात अक्षता गुजर,आर्या कडू, अंकिता यादव, आराध्या मोरे,मेहेर खान, राधिका वाघमारे, मेहेक चव्हाण,अनशिका बारी, स्नेहा गागरे, अनन्या भगत, सही धानकर, सिमरन जयस्वाल,कशिशकुमारी सिंग, मेहेक चौहान,शुभम सिंग,रोशन गुप्ता यांच्या कवितांनी मंत्रमुग्ध केले.
पावसाच्या, पाण्याच्या
शेतीच्या, मातीच्या
डोंगराच्या, सागराच्या
कविताच कविता
जणू कोसळत होता
कवितांचा पाऊस
या उपक्रमाबद्दल शिक्षक बंधू व व भगीनींनी तसेच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
स्नेहा गागरे व अंकिता यादव या विद्यार्थ्यांनींनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *