सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा
1 min read

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा

Loading

“सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा

अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर आणि जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सेवाशर्ती आणि आर्थिक सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी परिषदेतर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री रोकडे साहेब यांना निवेदन देताना अध्यक्ष सागर बघुरे, उपाध्यक्ष गिरीश पाचपांडे, सचिव सौ सुनीता पाटील, तसेच चळवळीतील कार्यकर्ते श्री राणे सर, पी. बी. पाटील सर, श्री शरद पाटील, श्री भिवंसन पाटील, वंजारी सर, संदीप पाटील, श्री सुकलाल पाटील आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत त्यांनी आपले विचार मांडत शासनाला सहानुभूतीपूर्वक सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

1️⃣ ग्रंथालय अधिनियम १९६७ मध्ये कालसुसंगत सुधारणा करणे व कामाचे तास सहा ऐवजी आठ तास करणे.
2️⃣ कर्मचार्‍यांना शैक्षणिक पात्रतेनुसार वेतनश्रेणी लागू करणे व किमान वेतन खात्यात जमा करणे.
3️⃣ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाशर्ती नियमावली लागू करणे.
4️⃣ कर्मचार्‍यांच्या वेतनात दरवर्षी १०% वाढ करणे.
5️⃣ विमा हॉस्पिटलद्वारे वैद्यकीय सेवा लाभ उपलब्ध करणे.
6️⃣ कर्मचार्‍यांना असंघटित कामगारांचा दर्जा देणे.
7️⃣ निवृत्तीनंतर वेतन व सन्मान सुनिश्चित करणे.
8️⃣ सार्वजनिक ग्रंथालयांसाठी ४०% अनुदान वाढीचा निर्णय लवकरात लवकर काढणे.
9️⃣ ग्रंथालयाचा दर्जा/वर्ग बदलाचा आदेश लवकर जाहीर करणे.

ग्रंथालय कर्मचारी या मोर्चा मार्फत आपले अधिकार, सेवाशर्ती आणि आर्थिक सुरक्षा यासाठी एकत्रित आवाज उठवत आहेत. उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की, “हे लढाई फक्त वेतनासाठी नाही, तर सार्वजनिक ग्रंथालयांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *