अमळनेर नगर परिषदेत आरक्षण जाहीर – महिला, एससी व अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव; नगराध्यक्ष पद एसटीसाठी राखीव”
1 min read

अमळनेर नगर परिषदेत आरक्षण जाहीर – महिला, एससी व अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव; नगराध्यक्ष पद एसटीसाठी राखीव”

Loading

“अमळनेर नगर परिषदेत आरक्षण जाहीर – महिला, एससी व अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव; नगराध्यक्ष पद एसटीसाठी राखीव”

अमळनेर प्रतिनिधी – आज अमळनेर नगर परिषदेत आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आरक्षणानुसार प्रभागांची विभागणी अशी करण्यात आली आहे की, प्रभाग क्रमांक 2, 4, 6 एसी/एससी राखीव आहेत; यामध्ये 6 प्रभाग एससी महिला, 4 प्रभाग एसी महिला आणि 2 प्रभाग एससी पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक 3 आणि 18 राखीव असून प्रभाग 3 मध्ये अनुसूचित जमाती महिला निवडणुकीस पात्र राहतील. नामनिर्दिष्ट प्रभाग क्रमांक 16, 15, 12, 5, 17, 13, 10, 7, 8, 11 यामध्ये महिला राखीव प्रभाग 17, 11, 13, 7, 12 आहेत, तर प्रभाग क्रमांक 1, 9, 14 जनरल प्रभाग राहिले आहेत.
अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या आरक्षणासाठी वर्षांपासून अथक प्रयत्न केले आहेत. आरक्षण जाहीर झाल्यामुळे काहींना आनंद होत आहे, तर काहींना आपल्या प्रभागात आरक्षण निघाल्याने नाराजी व्यक्त झाली आहे. नगरपरिषदेची येणारी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार असून, नगराध्यक्ष पद एसटी सर्वजर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याने एसटी कॅटेगिरीतील अनेक उमेदवारांनी आतापासूनच उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे राजकीय पक्ष आपल्या हक्काच्या उमेदवाराला नगराध्यक्ष बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. अमळनेर तालुक्यातील विद्यमान आमदार अनिलदादा पाटील आणि त्यांच्या पदाधिकारी,पक्षाचे कार्यकर्ते, खासदार स्मिताताई वाघ,माजी आमदार शिरीषदादा चौधरी, कृषीभूषण साहेबराव पाटील आणि डॉक्टर बी. एस. पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील या संदर्भात कोणती भूमिका घेतील, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

अमळनेर प्रभागात माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजसेवेतील अविरत योगदान”

अमळनेर शहरातील काही प्रभागांमध्ये माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीच्या अगोदरच प्रभागातील कामाला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या कामाचे मूळ कारण फक्त निवडणूक नसून, समाजसेवा त्यांच्यात रक्तसारखी आहे. प्रभागातील मतदारांशी त्यांची घट्ट नाळ असून, त्यांच्या कामात सातत्य आणि निष्ठा दिसून येते. यात विक्रांत पाटील, स्वप्ना पाटील, रवींद्र पिंताबर पाटील, प्रताप शिंपी, राजेश पाटील, नरेंद्र चौधरी आणि बाळासाहेब संदानशिव यांचा सहभाग तर नगराध्यक्ष पदासाठी एसटी संवर्गातील इच्छुक उमेदवार पत्रकार जितू ठाकूर, मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदेसह अनेक इच्छुक आहेत पण राजकीय पदाधिकारी कोणाला संधी देणार हे येणारा काळ ठरवेल..विशेष लक्षवेधी आहे. हे सर्व सामाजिक कार्यकर्ते प्रभागातील सर्वसामान्य नागरीकांशी घट्ट जोडलेले असून, त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे स्थानिक विकास आणि समाजसेवेतील योगदान दृढ होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *