कल्याण येथे अखिल महाराष्ट्र वंजारा समाजाचे पहिले राज्यस्तरीय काव्यसमेलन उत्साहात संपन्न.* *नवोदित कवींनी संतांच्या वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलावी संतवाड्मयाच्या वारसा सांगता येईल. ::कवी गीतकार रविंद्र कांगणे*
![]()
*कल्याण येथे अखिल महाराष्ट्र वंजारा समाजाचे पहिले राज्यस्तरीय काव्यसमेलन उत्साहात संपन्न.*
*नवोदित कवींनी संतांच्या वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलावी संतवाड्मयाच्या वारसा सांगता येईल. ::कवी गीतकार रविंद्र कांगणे*
ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण येथे आयोजित पहिल्या अखिल महाराष्ट्र वंजारा समाजाचा पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन कवी रविंद्र कांगणे यांचा अध्यक्षतेखाली,प्रसिद्ध सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ.विजय पंडित यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य शाखेचे अध्यक्ष कवी रमेश आव्हाड आव्हाड यांनी केले.कवीच्या भावनांचा कल्लोळ म्हणजे कविता असते, आणि त्या भावना स्फुरलेला विषय कवी जेव्हा शब्दात व्यक्त करतो. तेव्हा फक्त शब्दांचे मनोरे उभे न करता आणि वाचकांचे तात्पुरतं मनोरंजन न करता ,कविता ही समाजाला दिशादर्शक ठरावी. तिने प्रबोधनाचा हत्यार उपसावं आणि भरकटलेल्या समाजाला सुपंथाला, योग्य मार्गाला,प्रसंगी वठणीवर आणण्याचं काम कवितेने करावं. तुकोबा न्यानोबा चा वारसा मराठी कवितेला लाभलेला आहे आणि आजच्या समकालीन कवींनी हा संतांच्या साहित्याचा समृद्ध वारसा तेवढ्याच ताकतीने पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलावी तेव्हाच कुठे आपल्याला संत वाङ्मयाचा वारसा सांगता येईल. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील कवी गीतकार रवींद्र कांगणे यांनी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणच्या साहित्य शाखेच्या वतीने सार्वजनिक वाचनालय कल्याण कल्याण येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात अध्यक्ष पदावरून बोलताना आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ.विजय पंडित यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य शाखेचे अध्यक्ष कवी रमेश आव्हाड यांनी केलेल्या प्रास्तविकात काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन आणि पहिल्या वंजारी समाज साहित्य संमेलनाचे आयोजन यामागील भूमिका स्पष्ट करताना समाज संघटित करताना नेहमी दुसऱ्याला मोठे करावे आणि प्रत्येकाने आपले लिखाण करताना इतरांचेही लेखन वाचावे, ऐकावे असे सूचित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी गीतकार अरुण म्हात्रे हे उपस्थित होते. अरुण म्हात्रे यांनी सदर वेळी सादर केलेल्या वेगवेगळ्या कवितांनी संमेलनात बहार आणली व नवकवीना कवितेविषयी मार्गदर्शन केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर धात्रक यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.शंकरराव आव्हाड हे उपस्थित होते. सदर वेळी ह.भ.प.श्री लक्ष्मणबुवा आव्हाड दातलीकर यांचे स्मरणार्थ घेण्यात आलेल्या राज्य स्तरीयकाव्य लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन करण्यात आला. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनील रामनाथ सोनवणे ठाणे, द्वितीय क्रमांक डॉ.ज्ञानेश्वर जायभाये, बुलडाणा, तृतीय क्रमांक तारा मनोहर काळे, नाशिक यांना मिळाला तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक प्रशांत आंधळे कल्याण,गोरख आघाव रायगड, ऋतुजा काळकाटे धुळे, यांना देण्यात आले तर डॉ.मंगल सांगळे,सिन्नर, श्रावणी महेंद्र सांगळे नाशिक यांच्या कविता परीक्षकांच्या दृष्टीने लक्षवेदी ठरल्या. यावेळी निमंत्रीत कवी शीतल संखे पालघर, अजित मालंडकर कल्याण, भास्कर गीते नांदेड, यांनी तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या कविनी आपल्या कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अविनाश सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.रामनाथ दौंड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरचिटणीस वाहतूक पोलिस उपनिरीक्षक अर्जुन डोमाडे यांचेसह कवयित्री सुधा पालवे, प्रा. अर्जुन उगलमूगले, लक्ष्मण आव्हाड, योगेश घुगे, शिवाजी आव्हाड, सौ. वंदना सानप, सौ. चंद्रकला दराडे, सौ.शिंधू आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

