अमळनेर तालुका मराठा समाजतर्फे उदया “मराठा समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित
![]()
अमळनेर तालुका मराठा समाजतर्फे उदया “मराठा समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका मराठा समाज, अमळनेर, जि. जळगाव तर्फे मराठा समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ भव्य स्वरूपात आयोजित केला जात आहे. हा समारंभ समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या योगदानाची गौरवयात्रा ठरणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थानी मा. दादासो. आ. श्री. अनिल भाऊदास पाटील (माजी कॅबिनेट मंत्री व आमदार, अमळनेर विधानसभा मतदार संघ) उपस्थित राहणार आहेत, तर पुरस्कारांचे शुभहस्ते मा. आ. भाईसो. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील (अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई) करणार आहेत. समारंभात मुख्य अतिथी म्हणून मा. खा. श्रीमती स्मिताताई वाघ (खासदार, जळगाव लोकसभा मतदार संघ) उपस्थित राहणार आहेत.
समारंभात प्रमुख पुरस्कारार्थी म्हणून मा. दादासो. आ. श्री. अमोल चिमणराव पाटील (आमदार, पारोळा-एरंडोले विधानसभा मतदार संघ), मा. आ. डॉ. बी. एस. पाटील (माजी आमदार, अमळनेर), मा. दादासो. श्री. कृषीभूषण साहेबराव पाटील (माजी आमदार, अमळनेर), मा. भैयासो. श्री. विनोद राजधर पाटील (माजी नगराध्यक्ष, अमळनेर), मा. नानासो. श्री. पांडुरंग पाटील (जेष्ठ पत्रकार, अमळनेर) यांचा समावेश आहे. तसेच विशेष सत्कारार्थी म्हणून मा. अण्णासो. श्री. नथ्थू गुणवंतराव सोनवणे (उपसरपंच, गृ. प्रा. प., हेडकु) आणि मा. बापूसो. गिरीश सोनोजी पाटील (लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत, अमळगांव) यांचा सत्कार केला जाणार आहे.
हा समारंभ रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५, सकाळी १० वाजता के. सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालय, पटवारी कॉलनी, धुळे रोड, अमळनेर, जि. जळगाव येथे होणार आहे. कार्यकारी मंडळात उपाध्यक्ष म्हणून श्री. राजेंद्र प्रभाकरराव देशमुख आणि श्री. संजय कृष्णा पाटील, सह सचिव म्हणून श्री. प्रविण श्रीराम पाटील आणि कार्यकारी सदस्य म्हणून श्री. शिवाजी मोहन पाटील, श्री. मनोहर छबू पाटील, श्री. कैलास रामदास पाटील, श्री. संजय पुनाजी पाटील, श्री. चंद्रकांत प्रभाकर काटे, श्री. स्वप्निल वसंतराव पाटील, श्री. संजीव शालिग्राम पाटील, श्री. जयप्रकाश रामदास पाटील, डॉ. श्री. सुमित अशोक पाटील, श्री. गौरव उदय पाटील, श्री. भूषण संजय भदाणे यांचा समावेश आहे. निमंत्रक म्हणून श्री. महेंद्र शालिग्राम बोरसे (कोषाध्यक्ष), श्री. विक्रांत भास्करराव पाटील (मानद सचिव) आणि श्री. जयवंतराव मनसाराम पाटील (अध्यक्ष) यांची भूमिका आहे. समाजातील सर्व मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित असून, हा कार्यक्रम मराठा समाजाच्या एकतेचा आणि कर्तृत्वाचा सन्मान दर्शवणारा ठरणार आहे.

