स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र*
![]()
*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र*
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी शासनाचे विविध शिष्यवृत्ती ,अर्ज व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन झाली
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री संतोष मनुरे (मु.जे.महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक) व श्री कुलदीप भालेराव (मु.जे.महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपिक) हे होते.
श्री संतोष मनुरे सरांनी 11वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क माफी योजनेबद्दल माहीती दिली. तसेच MAHA DBT Portal वर कसा अर्ज भरावा तसेच त्यासाठीचे लागणारे कागदपत्र यांविषयी माहिती दिली.
तर श्री कुलदीप भालेराव सरांनी SC/ST/NT/OBC /EWS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शिष्यवृत्ती बद्दल माहीती दिली. त्यात त्यांनी post metric, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, स्वाधार योजना इ. शिष्यवृत्ती बद्दल महिती दिली.तसेच विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा अर्ज करताना येणाऱ्या समस्या व विविध शंकेचे निवारण केले.
आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा जेणेकरुन त्यांना आर्थिक
सहायता मिळून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे सर व उपप्राचार्य प्रा.आर.बी ठाकरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.बी ठाकरे सर हे उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती बऱ्हाटे व कला वाणिज्य शाखेचे समन्वयक श्री.उमेश पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण समितीच्या अध्यक्ष प्रा.ज्योती सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. कविता सोनवणे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संदिप गव्हाळे , प्रा.विनोद पावरा, प्रा.सुरेखा पाटोळे, प्रा.कविता भारूळे या सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

