धरणगावातील सत्यशोधक झाले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार !…. डॉ. बाबा आढाव यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्कार प्रदान !….
![]()
धरणगावातील सत्यशोधक झाले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार !….
डॉ. बाबा आढाव यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्कार प्रदान !….
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – धरणगाव शहरातील सत्यशोधक कार्यकर्ते यांनी पुणे येथे झालेल्या शाक्त शिवराज्याभिषेक दिन, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा २०२५ चे साक्षीदार झाले. पुणे येथील श्रीमंत श्री खासेसाहेब पवार सभागृह, श्री शिवाजी मराठा सोसायटी, शुक्रवार पेठ, पुणे येथे हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याचे उद्घाटक सेवानिवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी उद्योजक राजकुमार धुरगुडे, स्वागताध्यक्ष शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णासाहेब थोरात, या समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ सत्यशोधक डॉ. बाबा आढाव, माजी आमदार उल्हास पवार, जयदेवराव गायकवाड, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, सेवानिवृत्त न्यायाधीश मान्धाता झोडगे, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, सेवानिवृत्त साखर संचालक संपतराव साबळे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक एस एम मुश्रीफ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सत्यशोधक विचारवंत किशोर ढमाले, माजी महापौर वैशाली बनकर, सामाजिक कार्यकर्त्या अबेदा इनामदार, माजी महापौर कमल व्यवहारे यासह शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम जेध मेंशन पासून सत्यशोधक विचार यात्रेला सुरुवात करण्यात आली. सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक समाज संघाच्या झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सत्यशोधक डॉ.बाबा आढाव यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्कार देऊन सत्यशोधक उत्तमराव (नाना )पाटील तरवडी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सोहळा ३ सत्रामध्ये घेण्यात आला. सकाळी ९ वाजेपासून तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विविध मान्यवरांनी प्रबोधनाच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा केली व मार्गदर्शन केले. या सोहळ्याला हॉलच्या बाहेर पुस्तकांचे स्टॉल लावले होते या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्रातून 15 जिल्ह्यातील सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील सत्यशोधक आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, पी डी पाटील, गोरख देशमुख, निलेश पवार, प्रा.आकाश बिवाल, एरंडोल येथील सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन हे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद काकडे, ऍड. मिरज धुमाळ, मोहिनी कारंडे, तर आभार दत्ताजीराव जाधव, अंजुम इनामदार, रघुनाथ ढोक यांनी मानले. या सोहळ्याला पुणे येथील सर्व परिवर्तनवादी / सत्यशोधक तथा शिव फुले शाहू आंबेडकर चळवळी, सर्व सामाजिक संघटना च्या सहकार्याने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

