नाथपंथी समाजासाठी गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळाची स्थापना – वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आभार सोहळा , उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ. शोभा शिंदे यांची निवड
1 min read

नाथपंथी समाजासाठी गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळाची स्थापना – वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आभार सोहळा , उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ. शोभा शिंदे यांची निवड

Loading

नाथपंथी समाजासाठी गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळाची स्थापना – वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आभार सोहळा

उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ. शोभा शिंदे यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ नाथपंथी समाजाला मिळवून दिल्याबद्दल अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने नवी मुंबई येथे वनमंत्री मा. गणेशजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आभार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. जयाजी नाथ साहेब, राज्य समितीचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष म्हणून अमळनेर येथील सौ. शोभा रघुनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीपत्राचे वितरण महासंघाचे सचिव योगेशजी बर्वे, अनिल कानडे व बालकनाथ वरपे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बाळकृष्ण जाधव, कलावती वरपे, ज्ञानेश्वर लाइ आदींचे विशेष सहकार्य लाभले.
नियुक्तीनंतर सौ. शोभा शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले व नाथपंथी समाजाच्या सामाजिक संघटन व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
👉 ही निवड नाथपंथी समाजातील महिला सक्षमीकरणासोबतच समाजाच्या एकात्मतेला नवे बळ देणारी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *