प्लास्टिक जनजागृतीसाठी झटताहेत धरणगावचे चिमुकले*
1 min read

प्लास्टिक जनजागृतीसाठी झटताहेत धरणगावचे चिमुकले*

Loading

*प्लास्टिक जनजागृतीसाठी झटताहेत धरणगावचे चिमुकले*
—————————————————–
धरणगाव -( प्रतिनिधी ) येथील पी. आर. हायस्कूल या शाळेत प्लास्टिक जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या *स्वच्छता ही सेवा* या उपक्रमात विद्यार्थ्यांनी थक्क करणारे प्लास्टिक गोळा केलेले आहे. कोणत्याही कामाची सुरुवात आधी आपल्या स्वतःपासून केली पाहिजे असे सांगत पाटील यांनी स्वतःच्या घरी देखील गेल्या अनेक वर्षापासून असे प्लास्टिक संकलन केलेले आहे. शक्य त्या प्लास्टिक पिशव्यांमधून विविध प्रकारची रोपेही तयार केलेली आहेत. शाळेतील पालक सभा, माता पालक मेळावा यामधून पालकांना, ग्रामस्थांना प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत , प्लास्टिक बंद करून संकलन करण्याबाबत वेळोवेळी आवाहन केले आहे. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असणाऱ्या या शाळेत नेहमी सर्वांगीण आणि जीवन शिक्षणावर भर दिलेला आहे. त्यांनी पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी व आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने सर्वांना सातत्याने आवाहन केले की, शाळेमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच राष्ट्र निर्मितीसाठी जबाबदार नागरिक घडवणे देखील तितकेच गरजेचे आहे. एवढेच नाही तर कोणतीही वस्तू विकत घेताना विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशवी न घेता बाजारात जाताना सोबत कापडी पिशवी ठेवावी असेही आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *