शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट- अशोक नखाते
1 min read

शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट- अशोक नखाते

Loading

शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट असते
अशोक नखाते

आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे शालेय जीवन या शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन करण्याची क्षमता हीच जीवनाची खरी वाट असते असे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्पगुंपताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल सर यांनी भूमिका विषद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सानिया चौधरी यांनी केले .प्रमुख पाहुण्यांचा परिचय वर्गशिक्षक एस. के. राणेराजपूत यांनी करून दिला .प्रास्ताविक सिद्धीका पाटील या विद्यार्थिनीने सादर केले .भूपाळी देवयानी माळी आणि तिच्या मैत्रिणी या विद्यार्थिनींनी सादर केली.ईशस्तवन तनुश्री सोनवणे आणि तिच्या मैत्रिणी यांनी सादर केले .स्वागत गीत तेजस्विनी पाटील व तिच्या मैत्रिणी यांनी सादर केले .आभार प्रदर्शन पोर्णिमा फेगडे या विद्यार्थिनीने केले .व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, शुभांगिनी महाजन यांची उपस्थिती होती.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *