माध्यमिक विद्यालय शिंदीत कर्मवीर तात्यासाहेबांच्या २४ व्या पुण्यस्मरण सप्ताहाला उत्साहपूर्ण सुरुवात
![]()
माध्यमिक विद्यालय शिंदीत कर्मवीर तात्यासाहेबांच्या २४ व्या पुण्यस्मरण सप्ताहाला उत्साहपूर्ण सुरुवात
शिंदी प्रतिनिधी :(अश्विन पाटील सर)
कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी येथे दिनांक २३ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तात्यासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर सप्ताहाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जिभाऊ सो. श्री. एस.एस. पाटील सर व शिवश्री प्रा. सचिन देवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शिवश्री प्रा. सचिन देवरे सरांनी “हसू आणि असू” या विषयावर विद्यार्थ्यांना दिलेले व्याख्यान अतिशय मनमोहक ठरले. विद्यार्थ्यांनी खळखळून हसत व्याख्यानाचा आनंद घेतला.
सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन श्री. बी.जी. पाटील सर यांनी सविस्तर समजावून सांगितले.
संपूर्ण सप्ताहाचे आयोजन व यशस्वी पार पडण्यासाठी मुख्याध्यापक श्री. जिभाऊ सो. श्री. एस.एस. पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस.डी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर.पी. पाटील सर यांनी केले, आभार प्रदर्शन श्री. पी.डी. सोनवणे सर यांनी व्यक्त केले, तर कार्यक्रमाची प्रसिद्धी व छायाचित्रणाची जबाबदारी श्री. अश्विन पाटील सर यांनी यशस्वीपणे पार पाडली.



