युवा समिती अंबरनाथ शहर तर्फे – आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर
1 min read

युवा समिती अंबरनाथ शहर तर्फे – आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर

Loading

युवा समिती अंबरनाथ शहर तर्फे – आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर

अंबरनाथ युवा समितीच्या वतीने प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य योजना मोफत शिबिराचे आयोजन यश टेक सर्विसेस, श्री. भरत महाजन यांच्या दुकानात करण्यात आले. या कार्यक्रमावेळी युवा समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन युवा समिती प्रमुख श्री. मयुरेश कोल्हे यांच्या हस्ते झाले तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी माजी नगरसेवक श्री. संजय आदक, बांधकाम व्यावसायिक श्री. विजय वराडे, डॉ. कुणाल चौधरी, लेवा मंडळ सचिव श्री. अनिल झोपे, श्री. राजेंद्र झोपे, श्री. संजय कोल्हे, श्री. दीपक अत्तरदे, श्री. देविदास पाटील, श्री. प्रकाश इंगळे, तसेच युवा समितीचे शहराध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष श्री. किरण नेमाडे, सचिव सौ. स्मिता चौधरी आणि पदाधिकारी मीनाक्षी नारखेडे, श्री. भरत महाजन, श्री. दीपक वारके, श्री. चेतन चौधरी, श्री. मनोज चौधरी, श्री. गणेश सरोदे, सौ. पूनम सरोदे, सौ. वैशाली पाटील, सौ. योगिता अत्तरदे, श्री. निलेश झांबरे, सौ. शुभांगी महाजन, सौ. निधी अत्तरदे, श्री. जीवराम तळेले, सौ. भावना पाटील यांसह असंख्य मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराचा ४५ नागरिकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आई जोगेश्वरी इंटरप्राईसेस , सौ. विद्या झांबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
🙏आरोग्य हेच खरे धन! समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हीच खरी सेवा आहे. आयुष्मान भारत योजना सारख्या उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण करावे. समाजाने एकत्र येऊन अशा शिबिरांना प्रोत्साहन दिले तर आरोग्यदायी आणि सशक्त अंबरनाथ घडविणे शक्य होईल.🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *