जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे तज्ञ संचालक म्हणून राजेश पवार यांची नियुक्ती*
1 min read

जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे तज्ञ संचालक म्हणून राजेश पवार यांची नियुक्ती*

Loading

*जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे तज्ञ संचालक म्हणून राजेश पवार यांची नियुक्ती*

*जळगाव*= जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव यांच्या विद्यमान संचालक मंडळाची नुकतीच सभा जळगाव येथील रामानंद नगर येथील सार्वजनिक ग्रंथालय येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री सतीश दशरथ पाटील होते. सभेत मागील इतिवृत्त, जमाखर्च इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. नंतर जिल्ह्यातील काही वाचनालयाची माहिती तसेच अडचणी यावर चर्चा करण्यात आली तसेच ग्रंथालयाचा दर्जा वाढीवर आणि अनुदान वाढीसाठी निवेदन दिले पुन्हा द्यायचे निश्चित करण्यात आले. त्याच दिवशी दीपनगर भुसावळ येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय सचिव तसेच भुसावळ औष्णिक वीज केंद्र येथील लेखविभागातील व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले श्री राजेश अंबादास पवार यांची जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे तध्न्य संचालक म्हणून निवड करण्यात आली. या वेळी संघाचे उपाध्यक्ष श्री रवींद्र रामसिंग पाटील, कार्याध्यक्ष श्री संजय त्र्यंबक पाटील, व्यवस्थापक श्री सागर भगुरे, श्री नाना पाटील, श्री सुरेश पाटील आणि श्री राणे दादा तसेच सर्व विद्यमान संचालक उपस्थित होते. संचलन आणि आभार श्री सागर भगुरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *