रोटरी इंटरॅक्ट क्लब तर्फे “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान*
1 min read

रोटरी इंटरॅक्ट क्लब तर्फे “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान*

Loading

*रोटरी इंटरॅक्ट क्लब तर्फे “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान*

जळगांव प्रतिनिधी
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून रो. एड. सागर चित्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे व पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे उपस्थित होते. रोटरी इंटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी यांनी उपस्थितांचे स्वागत करून उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात रो. एड. सागर चित्रे यांनी विद्यार्थ्यांना शरीरासाठी आवश्यक पोषक घटक, संतुलित आहाराचे महत्त्व व त्याचे फायदे सांगितले. त्यांनी जंक फूडपासून होणारे नुकसान आणि घरगुती, सकस आहारामुळे मिळणारे आरोग्यदायी परिणाम विद्यार्थ्यांना समजावून दिले. तसेच ताजे फळे, भाज्या, कडधान्ये, दूध यांचा आहारात नियमित समावेश करण्याची सवय लावावी असे प्रतिपादन केले. पुरेसे पाणी पिणे, वेळेवर जेवण करणे व नियमित व्यायाम करणे याबाबतही त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.

व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी संयमपूर्वक उत्तरे देऊन शंका दूर केल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकस आहाराबद्दल सजगता निर्माण झाली.

कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे तसेच पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे व सहशिक्षक श्री. महेंद्र मिरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमाला रोटरी इंटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना आहार आणि स्वास्थ्याविषयी सजग राहण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *