तालुका भुलाबाई महोत्सव 2025 : रोहिणी कापडणे शिंदे मॅडम यांच्या टीमला बहुमान – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
![]()
तालुका भुलाबाई महोत्सव 2025 : रोहिणी कापडणे शिंदे मॅडम यांच्या टीमला बहुमान – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
अमळनेर प्रतिनिधी
केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव व भगिनी मंडळ, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा येथे आयोजित तालुका स्तरीय भुलाबाई महोत्सव स्पर्धा 2025 उत्साहात पार पडली. ग्रामीण भागातील विविध शाळा व संघटनांच्या चमूंच्या सहभागामुळे परिसरात उत्सवमूर्ती वातावरण रंगले होते.
या स्पर्धेत बालमोहन विद्यालय, चोपडा येथील शिक्षिका रोहिणी भास्करराव कापडणे शिंदे मॅडम यांच्या टीमने उत्कृष्ट सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांकाचे मानकरीपद पटकावले. त्यांच्या या यशामुळे टीमची निवड आता जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव स्पर्धेसाठी झाली असून, गावोगावी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोहिणी मॅडम या पंकज प्रतापराव शिंदे, शिक्षक – प्रताप विद्यामंदिर, चोपडा यांच्या अर्धांगिनी आहेत. तसेच त्या मा. भास्करराव नानाजी पाटील जानवेकर, (माजी अधीक्षक, जि.प. जळगाव व राष्ट्रीय उपाध्यक्ष, मराठा सेवा संघ – सावी) यांच्या कन्या आहेत.
या चमकदार यशामुळे चोपडा तालुक्याचा मान वाढला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील त्यांची टीम उत्तुंग कामगिरी करेल असा सर्वांना विश्वास वाटतो.

