कु.समीक्षा माकोडेने संपादन केला विभागस्तरीय कला उत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
1 min read

कु.समीक्षा माकोडेने संपादन केला विभागस्तरीय कला उत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.

Loading

कु.समीक्षा माकोडेने संपादन केला विभागस्तरीय कला उत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.

जळगांव प्रतिनिधी
जळगांव:एस.सी.ई.आर.टी. महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने काल शासकीय अध्यापिका विद्यालय, जुना आग्रा रोड, नाशिक येथे विभागस्तरीय कला उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के.सी. ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इ.१२वी कला शाखेची प्रज्ञाचक्षु विद्यार्थिनी कु. समीक्षा लक्ष्मीकांत माकोडेने जळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तिने अतिशय अटीतटीच्या झालेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तत्पूर्वी १ सप्टेंबर रोजी के.सी.ई. अध्यापक विद्यालय, जळगांव येथे पार पडलेल्या जिल्हास्तर कला उत्सव स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तरासाठी पात्रता मिळवली होती. तिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या संगीत शिक्षिका प्रा.मयुरी हरिमकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
*तिच्या ह्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, सांस्कृतिक समन्वयक श्री.शशिकांत वडोदकर, उपप्राचार्य प्रा.आर. बी.ठाकरे,पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे,समन्वयक प्रा.उमेश पाटील यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने समीक्षाचे अभिनंदन केले आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *