अमळनेरात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी “५६ भोग महाप्रसाद” सह आरती सेवेचा सोहळा
![]()
अमळनेरात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी “५६ भोग महाप्रसाद” सह आरती सेवेचा सोहळा
अमळनेर प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या सहाव्या (६) दिवशी अमळनेर शहरात भक्तिभाव, उत्साह व सामाजिक ऐक्याची अनोखी संगममयी झलक पाहायला मिळाली.
हनुमाननगर येथील “हनुमान नगरचा राजा” गणेशोत्सव मंडळ, गल्लीतील “बाळ गोपाळ गणेश मंडळ” व शहरातील एकमेव “श्रीकृष्ण व देशभक्त महिला गणेशोत्सव मंडळ” यांच्या आरतीची सेवा अमळनेर पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते पार पडली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक विक्रांत पाटील व सौ. स्वप्न पाटील यांना “५६ भोग महाप्रसाद” सह आरती करण्याचा मान मिळाला.
मंडळांच्या वतीने उत्सवी वातावरणात मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. या भव्य सोहळ्याबद्दल मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

