साने गुरुजी कन्या हायस्कूलची रिया योगेश जाधव विज्ञान मेळाव्यात प्रथम
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूलची रिया योगेश जाधव विज्ञान मेळाव्यात प्रथम
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 28 ऑगस्ट रोजी जीएस हायस्कूल अमळनेर येथे आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात साने गुरुजी कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी रिया योगेश जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या विज्ञान मेळाव्याचा विषय “क्वांटम युगाची सुरुवात : शक्यता आणि आव्हाने” असा होता. या विषयावर रियाने केलेले प्रभावी सादरीकरण विशेष दादस पात्र ठरले. तिला विज्ञान शिक्षक श्री. दीपक महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील, सचिव श्री. संदीप घोरपडे, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी रिया व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या यशामुळे अमळनेर तालुक्याचा आणि शाळेचा गौरव अधिक उंचावला आहे.

