जिल्हास्तरीय गुलाबी बोंडअळी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
![]()
जिल्हास्तरीय गुलाबी बोंडअळी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
अल्लीपूर (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) : कृषी विभाग महाराष्ट्र शासन व सिजेन्टा इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म- इसार संस्था, यवतमाळ यांच्या मार्फत आयोजित “जिल्हास्तरीय गुलाबी बोंडअळी मार्गदर्शन कार्यशाळा” दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी अल्लीपूर येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ. राजेशजी बकाने साहेब यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मा. राहुलजी चोपडा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने मा. तोरणे साहेब (उपविभागीय कृषी अधिकारी, हिंगणघाट), मा. शिवा जाधव (कृषी विकास अधिकारी, जि.प. वर्धा), मा. सुतार साहेब (तालुका कृषी अधिकारी, हिंगणघाट), मा. गोडसे साहेब (विभागीय व्यवस्थापक, सिजेन्टा कंपनी, नागपूर विभाग), मा. आखाडे साहेब (सिजेन्टा जिल्हा प्रतिनिधी, वर्धा), मा. दिवाकरजी भोयर (अध्यक्ष, अंमलबजावणी संस्था – इसार, यवतमाळ) व मा. भगत साहेब (गुणनियंत्रण कृषी अधिकारी, हिंगणघाट), गिरीश गावंडे जिल्हा समन्वयक (गुलाबी बोंड अळी प्रकल्प), इसार संस्थेचे प्रतिनिधी मिथुन कांबळे, सोनिया भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मा. डॉ. गावडे साहेब (वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर) व मा. डॉ. वझिरे साहेब (कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा) यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी 150 उपस्थित शेतकरी बांधवांना नोटपॅड, पेन, फाईल तसेच “कामगंध सापळे” प्रत्येकी 5 या स्वरूपात वाटप करण्यात आले. सिजेन्टा कंपनीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांसाठी चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

