गुरुवर्य जी. एस.पाटील विद्यालयात श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतार दिवस उत्साहात संपन्न.
![]()
गुरुवर्य जी. एस.पाटील विद्यालयात श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतार दिवस उत्साहात संपन्न.
परिवर्धां, शहादा( मनिलाल शिंपी)आज गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा येथे महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक.जगदीश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक के.एन.पाटील, व्हि.एन.पाटील, जी.एस.पटेल व सौ.भारती भट हे उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती आर.ए.पाटील यांनी नमो “चक्रधरा नमो योगेश्वरा “ही प्रार्थना विद्यार्थ्यांसह सादर केली. श्रीमती जी.डी.चौधरी यांनी आपल्या मनोगतातून भगवान श्री.चक्रधर स्वामी यांनी दिलेल्या सत्य,अहिंसा व मानवतेचा संदेश देऊन स्वामींचे अवतार कार्य विशद केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक जगदीश पाटील यांनी सर्व विषयाचे, सर्व तत्त्वज्ञानाचे सखोल ज्ञान असणारे सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांनी भक्ती, प्रेम आणि समानता याची शिकवण देताना बाह्य अवडंबर न करता शुद्ध अंतकरणाने एकनिष्ठ ईश्वर भक्ती करावी असा संदेश दिल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती आर.ए.पाटील यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.*

