_भादलीत कुंभार-कोळी समाजाच्या सामाजिक सभागृहांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !*_ *समाजाच्या प्रगती व एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे महत्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
![]()
*_भादलीत कुंभार-कोळी समाजाच्या सामाजिक सभागृहांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !*_
*समाजाच्या प्रगती व एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे महत्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील*
जळगाव दि. 24 ऑगस्ट ( जिमाका वृत्तसेवा ) भादली परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत आणि त्यातील बरीचशी कामे पूर्णत्वास गेली आहेत. मतदारसंघातील जिथे मागणी झाली तिथे तिथे सामाजिक सभागृहांची मंजुरी देऊन कामे केली आहेत. “समाजाच्या प्रगतीसाठी व एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे एक भक्कम व्यासपीठ ठरते. कुंभार आणि कोळी समाज हा श्रमप्रिय, कष्टाळू समाज आहे. आज त्यांच्या सभागृहांचे लोकार्पण होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. हे सभागृह समाजाचा अभिमान आणि आत्मसन्मान आहे. या ठिकाणांहून समाज एकत्र येईल आणि पुढच्या पिढ्यांना दिशा मिळेल. शेतीसोबत पशुपालन हा ग्रामीण जीवनाचा कणा असल्याने पशुसंवर्धन दवाखान्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन”, अशी ग्वाही पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.*
ते भादली बु. येथे कुंभार व कोळी समाजाच्या सामाजिक सभागृहांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.
*या कामांचे झाले लोकार्पण*
कुंभार व कोळी समाजाच्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येकी 20-20 लाखांचे सामाजिक सभागृह मंजूर केले होते. त्या दोन्ही सभागृहांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत विकास सोसायटी व समाजामार्फत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हितेश नारखेडे यांनी केले. तर आभार विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन संदीप कोळी यांनी मानले.
*यांची होती उपस्थिती*
या कार्यक्रमास सरपंच मनोज चौधरी, ग्रा. पं. सदस्य मीराबाई कोळी, अरुण सपकाळे, निलेश कोळी, गणेश कोळी, किशोर कोळी, अलीम पटेल, वि. का. सोसायटीचे चेअरमन जितेंद्र नारखेडे, व्हाईस चेअरमन संदीप कोळी, विभागप्रमुख पिंटू कोळी, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, माजी सरपंच मिलिंद चौधरी, नाना कोळी, कडू कोळी, सुनील नावकर, धनराज शेठ शिरसाट, सलीम पिंजारी, गोवर्धन गुरुजी, दत्तू कुंभार, गणेश कुंभार, प्रवीण कुंभार, भूषण पाटील, हितेश नारखेडे, जयदास कोळी, मार्केट कमिटीचे संचालक हर्षल नारखेडे, ईश्वर कुंभार, गणेश पाटील, योगेश कोळी, गिरीश भोळे, सुनील पाटील, चंदन बिऱ्हाडे, नशिराबाद माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, पिंटू शेठ पाटील, प्रविण खडसे, मनोज खडसे यांच्यासह भादली, आसोदा, नशिराबाद, भोलाणे परिसरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

