मुंबईचा अभय आळशी ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट वक्ता –यश पाटील द्वितीय, विवेक पाटील तृतीय  साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात –राज्यभरातील विद्यार्थ्यांची जुगलबंदी  आज दुपारी बच्चू कडू व निरंजन टकले यांचा विशेष सन्मान – समाजकार्य व पुरोगामी राजकारणाचा गौरव
1 min read

मुंबईचा अभय आळशी ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट वक्ता –यश पाटील द्वितीय, विवेक पाटील तृतीय साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात –राज्यभरातील विद्यार्थ्यांची जुगलबंदी आज दुपारी बच्चू कडू व निरंजन टकले यांचा विशेष सन्मान – समाजकार्य व पुरोगामी राजकारणाचा गौरव

Loading

मुंबईचा अभय आळशी ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट वक्ता –यश पाटील द्वितीय, विवेक पाटील तृतीय

साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात –राज्यभरातील विद्यार्थ्यांची जुगलबंदी

आज दुपारी बच्चू कडू व निरंजन टकले यांचा विशेष सन्मान – समाजकार्य व पुरोगामी राजकारणाचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेरमध्ये साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहाच्या निमित्ताने आयोजित द्वितीय वैखरी साथी गुलाबराव पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व साथी संदेश करंडक २०२५ रविवारी (दि. २४ ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या प्रतिभावान वक्त्यांनी “भारतीय संविधानाची ७५ वर्षे – एक चिंतन”, “आज गांधीजी असते तर…”, “शेतकरी कष्टकऱ्यांचे कैवारी – सानेगुरुजी”, “कृत्रिम बुद्धिमत्ता : आधार की आव्हान?” आणि “अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस” अशा विचारप्रवर्तक विषयांवर प्रभावी मते मांडून रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य सानेगुरुजी व कै. आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

मान्यवरांची उपस्थिती

विचारपिठावर प्रा. वैशाली पाटील (जळगाव), अ‍ॅड. सारांश सोनार, प्रा. योगेश पाटील, सानेगुरुजी स्मारक समितीच्या समन्वयक दर्शना पवार, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, सुनिल पाटील, संजीव पाटील, गोपाळ नेवे, वैशाली महाजन, रणजित शिंदे (व्हाईस चेअरमन अर्बन बँक), दिपक महाजन, समाधान पाटील, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, अ‍ॅड. कौस्तुभ पाटील, मनिष उघडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विजेतेपदाचा मान मुंबईकर विद्यार्थ्यांना

स्पर्धेत मुंबईच्या अभय आळशीने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुंबईच्याच यश पाटीलने द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय पारितोषिक जळगावच्या विवेक पाटील याला मिळाले.
उत्तेजनार्थ पारितोषिके पंकज पानवेल (अलिबाग) व रमेश कचरे (पुणे) यांना देण्यात आली.

प्रथम पारितोषिक ₹११,०००, द्वितीय ₹९,०००, तृतीय ₹७,००० तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ₹२,००० रोख रक्कम, आकर्षक स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र अशा पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली होती.

परीक्षक व सूत्रसंचालन

या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैशाली पाटील, प्रा. योगेश पाटील, अ‍ॅड. सारांश सोनार, प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी काम पाहिले.
सुत्रसंचालनाची जबाबदारी डि.ए. धनगर व धनश्री वानखेडे यांनी समर्थपणे पार पाडली.

पारितोषिक वितरण

विजेत्यांना मान्यवरांकडून रोख रक्कम देण्यात आली.प्रथम पारितोषिक सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक डि. के. पाटील सर यांच्या तर्फे,
द्वितीय पारितोषिक गोपाळ बडगुजर,
तृतीय पारितोषिक शिक्षक बापूराव ठाकरे,
उत्तेजनार्थ शेख सर व संजीव पाटील (मुख्याध्यापक) यांच्या तर्फे प्रदान करण्यात आले.

आयोजकांचा पुढाकार

या स्पर्धेचे आयोजन सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ, तसेच सानेगुरुजी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन विलास चौधरी यांनी केले.

विशेष आज कार्यक्रम

आज दुपारी ३ वाजता साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात सामाजिक पुरस्कार – निरंजन टकले यांना व राजकीय पुरोगामी पुरस्कार – आमदार बच्चू कडू यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुधीर तांबे भूषवणार असल्याची माहिती आयोजक अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *