ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधन साजरा
![]()
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधन साजरा
नांदेड प्रतिनिधी :
नांदेड येथील फरांदे पार्क ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने मालेगाव रोडवरील संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधनाचा कार्यक्रम अत्यंत आध्यात्मिक आणि भावनिक वातावरणात पार पडला.
या प्रसंगी राजयोगीनी ब्रह्माकुमारी अनिता दिदी यांनी आश्रमातील सर्व मातांना ईश्वरीय राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या व ईश्वरीय सौगातही अर्पण केली. अनिता दिदींनी प्रास्ताविक करताना रक्षाबंधनाचा आध्यात्मिक अर्थ समजावून सांगितला.
कार्यक्रमादरम्यान आश्रमाचे व्यवस्थापक विक्रमजी टरकेपाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जोगदंड भाई, जोगदंड माताजी, शिवलीला बहन व सरोजिनी बहन यांनीही सक्रिय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
या भावनिक क्षणांना वृद्धाश्रमातील जवळपास ४० ते ५० माता उपस्थित राहून साक्षीदार ठरल्या.
रक्षाबंधनाचा हा सोहळा केवळ बंधुभावाचे प्रतीक न राहता आध्यात्मिक संरक्षण व ईश्वरीय स्नेहाचे प्रतिक ठरला.

