“आनंदावर बंदी घालणार का लोकशाहीत?”
1 min read

“आनंदावर बंदी घालणार का लोकशाहीत?”

Loading

“आनंदावर बंदी घालणार का लोकशाहीत?”

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि शिक्षण क्षेत्रात सम्राट म्हणून ओळखले जाणारे बापूसाहेब अशोक आधार पाटील यांच्या व सहकारी मित्र वैयक्तिक क्षणातील नाचण्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या फोटोंवरून काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत बातम्या केल्या आणि वाचकांच्या मनात संभ्रमाचे तरंग उमटवले.
पण खरंच — एखादा व्यक्ती राजकारणात सक्रिय असला, तरी तो वैयक्तिक आयुष्यात आनंद व्यक्त करू शकत नाही का? आनंदाच्या क्षणी नाचणं, गाणं हे मानवी भावनांचे नैसर्गिक रूप आहे. लोकशाही देशात प्रत्येकाला आपला आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे. मग अशा वैयक्तिक क्षणांवरून कोणाला बदनाम करणे योग्य आहे का?
आपणही घरगुती कार्यक्रमात नाचतो, गातो, आनंद व्यक्त करतो. मग त्यावरून जर एखाद्या साध्या व्यक्तीची बातमी होत नाही, तर सार्वजनिक जीवन जगणाऱ्या नेत्याचा का? बातम्यांच्या नावाखाली अशा तुच्छ गोष्टींना महत्त्व देणं हे समाजात चुकीचा संदेश देणारं ठरतं.
आज माध्यमांनी विचार करायला हवा—एखाद्याच्या आनंदावर पाणी ओतणं पत्रकारितेचं काम आहे का? की त्याच्या कार्यकर्तृत्वाची, विकासकामांची खरी चर्चा करणे हाच आपला धर्म आहे?
कारण अशा वैयक्तिक बातम्या कुटुंबियांवर तणाव निर्माण करतात, मनोबल खच्ची करतात. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. म्हणूनच अशा बातम्या टाळायला हव्यात.
हे माझं वैयक्तिक मत असलं तरी, पत्रकारितेत २३ वर्षांचा प्रवास सांगतो—“एखाद्याच्या आनंदावरून बातमी करून त्याला बदनाम करणं म्हणजे पत्रकारितेच्या पवित्रतेला धक्का देणं होय.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *