अमळनेरात महिलांचा सन्मान सोहळा – लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण उत्साहात
1 min read

अमळनेरात महिलांचा सन्मान सोहळा – लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण उत्साहात

Loading

अमळनेरात महिलांचा सन्मान सोहळा – लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीच्या निमित्ताने अमळनेर सकल धनगर समाज आणि मौर्य क्रांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ‘पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ वितरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी म.सा.प. अध्यक्ष संदीप घोरपडे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेल तालुकाध्यक्ष एस. सी. तेले सर यांनी केले.
या प्रसंगी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासो बन्सीलाल भागवत, युवा कल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. अशोक पवार सर, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या राजश्रीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष (शरद पवार गट) डी. एम. पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
पुण्यतिथी निमित्त साप्ताहिक लेखन मंच या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. अजय भामरे सरांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर हृदयस्पर्शी कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे सरांनी विनोदी शैलीतून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान भाऊ धनगर, कृ.बा.स. संचालक नितीन पाटील, माजी भाजप शहराध्यक्ष हरचंद लांडगे, रियाज शेख, रज्जाक शेख, कदम भाऊसाहेब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारार्थी महिलांची नावे

या वर्षी ‘पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित झालेल्या महिला पुढीलप्रमाणे आहेत —

जयश्री पवार, पूजा शहा, भारती सोनवणे, माधुरी पाटील, डॉ. मनीषा लाठी, सुवर्णा धनगर, सुशीला अहिरे, क्रांती पाटील, भारती बाविस्कर, आशा महाजन, आशाबाई लांडगे, जयश्री बडगुजर, मनिषा पाटील, प्रा. डॉ. शबीना शेख, सुदर्शना पाटील, अँड तिलोत्तमा पाटील, सीमा रगडे, अश्विनी भिल, रूपाली धनगर.

प्रत्येक पुरस्कारार्थीला सन्मानपत्र, ट्रॉफी, पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुस्तक, दुपट्टा, शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला.
पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त करताना आपल्या कार्याचा आढावा मांडला आणि आयोजकांचे आभार मानले.

 

 

 

 

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा एकतारे मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन आनंदा धनगर सरांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ, तसेच हमाल मापाडी संघटना अध्यक्ष रमेश देव शिरसाठ, माजी न.पा. शिक्षण मंडळ सभापती नितीन निळे, मौर्य क्रांती संघ तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कंखरे, दिलीप ठाकरे, विजय मोरे, दयाराम पाटील, उमेश काटे , गोपाल हडपे  बापूराव ठाकरे, प्रा. दिनेश भलकार, प्रा. मनोज रत्नापारखे , विकास सुर्यवंशी, धनराज लांडगे यांचे मोलाचे योगदान लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *