गरजूंना आधार – प्रताप हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
1 min read

गरजूंना आधार – प्रताप हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

गरजूंना आधार – प्रताप हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

अमळनेर प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला प्रताप हायस्कूलने एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपली. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील सर यांच्या स्वेच्छेने मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात प्रा. पराग पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सचिव, मुख्याध्यापक निकम सर, चंद्रकांत कंखरे सर, किरण सनेर सर, कल्पेश सुर्यवंशी सर, कृष्णा कोळी सर, वि‍नोस पाटील सर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून या कार्याची शोभा वाढवली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात उत्साह आणि आत्मविश्वास संचारला असून, शाळेच्या सामाजिक जाणिवेचे हे उत्तम उदाहरण ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *