कान्हाच्या आगमनाची चाहूल – १५ ऑगस्टला सिध्दीविनायक कॉलनीत भव्य जन्माष्टमी उत्सव
1 min read

कान्हाच्या आगमनाची चाहूल – १५ ऑगस्टला सिध्दीविनायक कॉलनीत भव्य जन्माष्टमी उत्सव

Loading

कान्हाच्या आगमनाची चाहूल – १५ ऑगस्टला सिध्दीविनायक कॉलनीत भव्य जन्माष्टमी उत्सव

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– भक्तिरस, आनंद आणि उत्साहाचा मिलाफ असलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव यंदा सिध्दीविनायक कॉलनी, युनियन बँकेसमोर, अमळनेर येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) रोजी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत हा भव्य सोहळा पार पडणार असून, कान्हाच्या जन्मक्षणाची प्रतीक्षा करणारे भाविक सीहळा आणि भजनाच्या कार्यक्रमात तल्लीन होणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती मिराबाई मधुकर पाटील, श्री. लोटन मधुकर पाटील, सौ. प्रतिभा लोटन पाटील, श्री. सौरभ लोटन पाटील (शहर उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेर) आणि सौ. दिप्ती सौरभ पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमा दरम्यान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, गोकुळातील खेळ, भक्तीगीतांचा रसाळ वर्षाव आणि दहीहंडीचा आनंद यांचा संगम भाविकांना अनुभवता येणार आहे. कान्हाच्या आगमनाचे मंगल ध्वनी आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमणार आहे.
भाविकांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहून या भक्तिरसात न्हाऊन निघावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – ८४५९५३७२२१ / ९०२१२२७६४९ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *