भाषा, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सोहळा – ए.टी. झांबरे विद्यालयात वाङ्मय मंडळाचे भव्य उद्घाटन
![]()
भाषा, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सोहळा – ए.टी. झांबरे विद्यालयात वाङ्मय मंडळाचे भव्य उद्घाटन
जळगांव प्रतिनिधी
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे व बालकवी त्रंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मुक्ता महाजन माजी विभाग प्रमुख (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) उपस्थित होत्या.
याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात विश्व संस्कृत दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे ज्येष्ठ शिक्षिका सौ.प्रतिभा लोहार, सौ.सुचिता बाविस्कर, श्री.निर्मल चतुर सर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वाड्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यालयात राबविण्यात येणारे शैक्षणिक व सांस्कृतिक सहशालेय उपक्रम यांची माहिती श्री.निर्मल चतुर सर यांनी दिली.
*शुभेच्छा संदेश*
प्रा .डाॅ. मुक्ता महाजन यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत भाषेचे महत्त्व पटवून देत आपले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेत आलेले अनुभव कथन केले.तसेच भाषेतील शब्द, हावभाव, सादरीकरण, सभाधैर्य, वाचन, लेखन साहित्य ओळख करुन देत महत्त्व पटवून दिले.व विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमात काव्या फेगडे या विद्यार्थ्यीनीने गणेशवंदना सादर केले.तर अनुश्री चौधरी या विद्यार्थ्यीनीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या युद्धनीती , राजधर्म, राजनिती, शौर्य गाथा सांगुन उपस्थितांची दाद मिळवली.
सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतील स्तोत्र पठण केले.हिंदी,इंग्लिश, मराठीत स्वलिखित काव्य सादर केले.भारुडाच्या व रांगोळी, नाटिका,पोस्टर्स, ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पराग राणे व आभार प्रदर्शन सौ.प्रतिभा लोहार मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील भाषा विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


