तिमिरातुनी तेजाकडे पुस्तिकेचे स्वातंत्र्यदिनी प्रकाशन सानेगुरुजी विद्यालयात होणार ‘तिमिरातून तेजाकडे’चे लोकार्पण
![]()
तिमिरातुनी तेजाकडे पुस्तिकेचे स्वातंत्र्यदिनी प्रकाशन
सानेगुरुजी विद्यालयात होणार ‘तिमिरातून तेजाकडे’चे लोकार्पण
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ जयेश शिंदे लिखित तिमिरातुनी तेजाकडे या लैंगिक शिक्षणावरील पुस्तिकेचे प्रकाशन १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता सानेगुरुजी विद्यालयात संपन्न होत आहे.
खासदार स्मिताताई वाघ, आ. अनिल पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, मा. आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, मा. आ. डॉ बी एस पाटील, डॉ डिगंबर महाले आदींच्या हस्ते प्रकाशन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून
संदीप घोरपडे, गोकुळ बागुल, शिवाजीराव पाटील, सतीश देशमुख, डॉ अपर्णा मुठे , रावसाहेब मांगो पाटील हे असणार आहेत.
डॉ जयेश शिंदे लिखित व धनंजय सोनार यांनी शब्दांकन केलेल्या या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ जयेश शिंदे व डॉ प्रतिज्ञा शिंदे यांनी केले आहे.


