“स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन”
![]()
“स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन”
जळगाव प्रतिनिधी
एम जे कॉलेज यांचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे महान क्रांतिकारक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.त्यानंतर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील यांनी सुद्धा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा संदीप वानखेडे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या महान कार्याबद्दल समूहाला माहिती दिली.प्रतिसरकार साठी प्रसिद्ध असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांविरुद्ध सनदी व क्रांतिकारक मार्गाने लढा दिला.संसदेमध्ये मराठी भाषा करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ रणजीत पाटील यांनी केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

