किडनी रुग्णांसाठी मोठा दिलासा! चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू*
![]()
**किडनी रुग्णांसाठी मोठा दिलासा!
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू*
जळगांव प्रतिनिधी:
किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. येथे मोफत डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा लाभ गरजू रुग्णांना आता त्यांच्या गावातच मिळणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे पहिलेच ग्रामीण रुग्णालय आहे जिथे मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध झाली आहे. या सेवेमुळे आता रुग्णांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव किंवा धुळे यांसारख्या दूरच्या शहरांमध्ये प्रवास करण्याची गरज भासणार नाही.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी चाळीसगावचे आमदार मा. मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, “ग्रामीण रुग्णालयात ही सेवा सुरू होणे ही जनतेसाठी एक मोठी उपलब्धी आहे. यामुळे वेळ, पैसा व ऊर्जा वाचणार असून रुग्णांना स्थानिक स्तरावरच उत्तम सुविधा मिळतील.”
त्याचबरोबर १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधकाम प्रगतीपथावर असून लवकरच तेही कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या उपक्रमामुळे किडनी आजाराने पीडित असलेल्या अनेक रुग्णांना नवा दिलासा मिळाला असून, हे आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

