अमळनेरमध्ये भजन संध्या मोठ्या भक्तिभावात संपन्न “हारे का सहारा… बाबा श्याम हमारा!” या गगनभेदी जयघोषात रंगली भक्तीमय संध्या —
![]()
अमळनेरमध्ये भजन संध्या मोठ्या भक्तिभावात संपन्न
“हारे का सहारा… बाबा श्याम हमारा!” या गगनभेदी जयघोषात रंगली भक्तीमय संध्या —
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी, मंगळवारच्या पवित्र दिवशी श्री मंगळग्रह मंदिर, महाप्रसादालाय हॉल, अमळनेर येथे भजन संध्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाली.
या विशेष प्रसंगी, भुसावळ येथून आलेले सुप्रसिद्ध किशन चावराई व समूह यांनी सुमधुर भजने सादर करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. “करणारा श्याम… करवणारा श्याम!” या भावनेत रंगलेल्या श्रोत्यांनी मनापासून आनंद घेतला…
कार्यक्रमाला अमळनेर व परिसरातील अनेक श्यामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम लखदातार भक्त परिवार, अमळनेर व मंगळग्रह सेवा संस्थाचे अध्यक्ष राजु महाले सर व विश्वस्त मंडळाची मोठी मदत भेटली व शुभम मुंदडा,बंटी सैनानी,प्रितेश मणियार , हरिओम अग्रवाल, ऋत्विक भामरे,चिराग मुंदडा,अभिनय मुंदडा,व्यंकटेश शर्मा,निशांत शर्मा, हितेश बित्राई,रोनक शाह, कुशल कोठारी ,कृष्णा वर्मा,जय नागदेव,दिशांना जोशी,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
भजना नंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला. आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अशाच भक्तिमय संध्यांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे आश्वासन दिले…

