स्व. हरिभाऊ वाकणकर पुरस्कार जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांना जाहीर!*
![]()
*स्व. हरिभाऊ वाकणकर पुरस्कार जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांना जाहीर!*
जळगाव: दि. ४ ऑगस्ट – भारतीय इतिहास संकलन समिती, महाराष्ट्र ( देवगिरी प्रांत ) यांच्या वतीने इतिहास आणि शिक्षण क्षेत्रात प्रबोधन आणि संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा स्व. हरिभाऊ वाकणकर पुरस्कार जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार येत्या १२,१३ ऑगस्ट रोजी भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, पाटेश्वर आणि इतिहास संकलन समितीच्या वतीने माजलगाव येथील सिध्देश्वर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रांतीय अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे.या अधिवेशनाची संकल्पना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य आहे.राजेंद्र नन्नवरे यांचे पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि सृजनाधिष्ठित शिक्षण या क्षेत्राबरोबरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या ह्या कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राजेंद्र नन्नवरे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन सदस्य असून, केशव स्मृती प्रतिष्ठान, समर्पण संस्था, सातपुडा फाउंडेशन ( अमरावती ) या संस्थांच्या माध्यमातून कार्य करीत आहेत.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर , भारतीय ज्ञान परंपरा ( पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन ) हा त्यांचा अभ्यास, व्यासंग व संशोधनाचा विषय आहे. तसेच राजेंद्र नन्नवरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

