“उत्कृष्ट संचालक” पुरस्काराने सौ. वैशाली पाटील यांचा सन्मान , जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या कार्यक्षम व पारदर्शक नेतृत्वाची दखल; गोधमगावकर स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो मानाचा पुरस्कार
![]()
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळ सदस्या सौ. वैशालीताई पाटील यांना “उत्कृष्ट संचालक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कल्याण:(सुनिल इंगळे)
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक मंडळाच्या सन्माननीय सदस्या व कर्मचारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील यांना आज “उत्कृष्ट संचालक” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार कै. दत्तात्रयराव गंगाधरराव गोधमगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात आला. गोधमगावकर हे संस्थेच्या माजी कोषाध्यक्षा श्रीमती अर्चना शरदचंद्र हयातनगरकर यांचे वडील होत. त्यांच्या वडिलांच्या कार्याची आणि मूल्यांची आठवण म्हणून, श्रीमती हयातनगरकर यांच्या पुढाकाराने हा पुरस्कार दरवर्षी कार्यक्षम व कर्तृत्ववान संचालकाला दिला जातो.सौ. वैशाली विकास पाटील यांनी केवळ संस्थात्मक कामकाजातच नव्हे तर पतसंस्थेच्या आर्थिक पारदर्शकतेत व कार्यक्षमतेत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, निर्णयक्षमता आणि सहकाऱ्यांशी सुसंवाद या गुणांमुळे त्या संस्थेच्या नेतृत्वात एक विश्वासार्ह चेहरा म्हणून उदयास आल्या आहेत.या पुरस्काराने त्यांच्या नेतृत्वगुणांना, योगदानाला आणि सेवाभावनेला अधिक मान्यता लाभली आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर, सहकारी व कर्मचारी सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
सौ. वैशाली विकास पाटील यांना मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

