अध्ययन स्तर पडताळणी वस्तूनिष्ठ व्हावी – विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी*
![]()
*अध्ययन स्तर पडताळणी वस्तूनिष्ठ व्हावी – विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी*
जळगाव -पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत नशिराबाद मराठी केंद्राची शिक्षण परिषद केंद्र शाळा नशिराबाद येथे घेण्यात आली. अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार होते. विद्यार्थी निपुण होण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया प्रभावी होणे आवश्यक आहे, तसेच विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती वस्तूनिष्ठपणे करुन शैक्षणिक उपाययोजना करावी असे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रतिपादन केले.सोबतच प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला.दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करुन उदघाटन करण्यात आले. केंद्र प्रमुख अविनाश पाटील, मुख्याध्यापक इरफान तडवी, तुषार सोनवणे,प्रमोद केळकर, जगदीश चौधरी, रजेसिंग गिरासे यांनी शिक्षण परिषदेचे नियोजन केले. शिक्षण परिषदेत माझा वर्ग माझे नियोजन, जिल्हा शैक्षणिक सद्यस्थिती, पायाभूत चाचणी, निपुण अध्ययन स्तर निश्चिती कार्यक्रम,एक पेड मा के नाम, अमृत वृक्ष कार्यक्रम, आधार नोंदणी, नव भारत साक्षरता कार्यक्रम, शालेय भौतिक सुविधा व सुरक्षितता इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.परिषदेला केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

