परभणी रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम
1 min read

परभणी रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम

Loading

परभणी रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम

परभणी प्रतिनिधी
परभणी जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म-इसार संस्था, परभणी या संस्थेच्या वतीने ‘एक्सेस टू जस्टिस’ प्रकल्पाच्या सहयोगाने परभणी रेल्वे स्थानकावर ३० जुलै २०२५ जागतिक बाल तस्करी विरोधी दिन साजरा करून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात रेल्वे स्थानक प्रबंधक, मुख्य तिकीट निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल (RPF), रेल्वे पोलीस आणि इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म-इसार संस्था, परभणी यांनी संयुक्तपणे सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून रेल्वे स्टेशन मॅनेजर एस.पी पासवान, RPF चे श्री. संतोष इंगोले, इसार संस्थेचे संचालक श्री.दिवाकर भोयर, प्रकल्प व्यवस्थापक श्री. मिथुन कांबळे, प्रकल्प समन्वयक सौ.सूर्यमाला मोतीपोवले, जिल्हा समन्वयक श्री. लक्ष्मण गायकवाड , तसेच सोनिया भगत आणि माया येरणे यांची उपस्थिती लाभली.
या जनजागृती मोहिमेदरम्यान, प्रवाशांना बाल तस्करी, बाल मजुरी, बाल अत्याचार आणि बाल संरक्षण याविषयी माहिती देण्यात आली. ‘चाईल्ड हेल्पलाईन 1098’ आणि ‘GRCP हेल्पलाईन 1800 1027 222’ या महत्त्वाच्या संपर्क क्रमांकांची माहिती देऊन, बालकांच्या संरक्षणासाठी सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले.
प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी JRC मार्फत प्राप्त हिंदी व इंग्रजी भाषेतील ऑडिओ संदेशही प्रसारित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्टेशनप्लॅटफॉर्मवर पोस्टर वपॉम्प्लेट लावण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांचे शोषण थांबवून त्यांचे संरक्षण व पुनर्वसन सुनिश्चित करणे.
या जनजागृती कार्यक्रमाला RPF, रेल्वे प्रशासन व इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म-इसार संस्था, परभणी संस्थेच्या टीमने सक्रिय सहभाग देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *