स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात”
![]()
“स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक ३ऑगस्ट २०२५ रोजी
सकाळी ठिक १० वाजेपासून आम्ही सिध्दलेखिका शाखा जळगाव च्या वतीने काव्यधारा काव्यसंमेलचे जळगाव येथे
अभियंता भवन महाबळ मध्ये आयोजन करण्यात आले आहे.
फक्त महिलांसाठी असणाऱ्या या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवयित्री मायाताई धुप्पड असून आम्ही सिध्दलेखिका संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या महाजन या उद्घाटक आहेत.तसेच स्वागताध्यक्ष कवयित्री जयश्री काळवीट आहेत.
सुप्रसिद्ध लेखिका प्रा.विमलताई वाणी, ललिता टोके मॅडम, स्मिता चौधरी यांचीही उपस्थिती सदर संमेलनास असेल.
संस्थेच्या उपाध्यक्ष ज्योती राणे,सभासद ज्योती वाघ, संध्या भोळे, संगिता महाजन, पुष्पा साळवे, इंदिरा जाधव, मंजुषा पाठक,सुनिता येवले आदी सर्व भगिनी संमेलनासाठी परिश्रम घेत आहेत.जळगाव परिसरातील अनेक कवयित्री या संमेलनात सहभागी होणार आहेत.तरी काव्यरसिक भगिनींनी या संमेलनाचा आनंद घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

