राजेंद्र शंकरपुरे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गौरव
![]()
राजेंद्र शंकरपुरे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गौरव
नांदेड प्रतिनिधी –
ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रमात भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि समाजघटनासाठी योगदान दिल्याबद्दल राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांना हा मानाचा पुरस्कार सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.
या गौरव सोहळ्याला तुकाराम बाबा महाराज मठाधिपती आश्रम, वैशाली चव्हाण (आयुक्त, मनपा पुणे), श्रीराम मांडुरके (पोलीस आयुक्त, पुणे), प्राजकता मालंजकर (रील स्टार), श्रेया परदेशी व ममता भोई (खानदेश अभिनेत्री) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शैक्षणिक व सामाजिक योगदान
राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे हे केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही अत्यंत सक्रीय आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी वेळोवेळी शैक्षणिक साहित्य वाटप, शाळांमध्ये संगणक व ई-लर्निंगसारख्या सुविधा पुरवण्यात पुढाकार घेतला आहे.
सामाजिकदृष्ट्या त्यांनी शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, महिला सबलीकरण उपक्रम, वृक्षारोपण मोहिमा, ग्रामस्वच्छता अभियान आणि बेरोजगार युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून समाज upliftment मध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांची कार्यशैली ही ‘प्रत्यक्ष कृतीतून सेवा’ या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळेच त्यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्याच्या व राज्याच्या पातळीवर आदर्शवत मानले जाते.

