कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; संवेदना फाऊंडेशनचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
1 min read

कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; संवेदना फाऊंडेशनचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Loading

*संवेदना फाऊंडेशन संस्थेचा गुणगौरव सोहळा संपन्न*
——————————-
*रत्नागिरी (प्रतिनिधी)* – संवेदना फाउंडेशन संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा विध्यार्थ्यांच्या भव्य उपस्थितीत संपन्न, सदर सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात मंडणगड तालुक्यातील शाळांत परीक्षा 2024 ते 2025 या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड,पंदेरी पंचक्रोशी हायस्कूल, लालबहादूर शास्त्री हायस्कूल – दहागाव, लाटवण पंचक्रोशी हायस्कूल लाटवण, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड तसेच स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी या मंडणगड तालुक्यातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संस्थेच्या वतीने भव्य स्वरूपात आयोजन केले होते.
सदर सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री रमेश घडवले मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री राजेंद्र फणसे मा. सदस्य रत्नागिरी जिल्हा परिषद,श्री अविनाश सोंडकर मा. पोलीस निरीक्षक व जात पडताळणी अधिकारी कोकण विभाग,श्री प्रशांत परब – आयटी तज्ञ,श्री विनोद दळवी – सरचिटणीस मंडणगड विकास मंडळ, मा. श्री ए. जे.हुलगे – प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय,श्री विनोद सदानंद चाळके संस्थेचे अध्यक्ष,स्नेह ज्योती अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा सेनगुप्ता,
श्री दत्ताराम जाधव रत्नागिरी शेतकरी खरेदी विक्री संघ, श्री दत्ताराम जाधव आस्वाद हॉटेलचे मालक, श्री जयेश मानकर सरपंच सोवेली,संस्थेचे सरचिटणीस विकास चाळके, सदस्य श्री अजय शिगवण श्री दीपक गुप्ता , श्री सुधाकर महाडिक तसेच शाळेचे शिक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित होते सदर सोहळा सुमारे तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेताना सामाजिक व जागतिक भान याचे पालन करणे जरुरीचे आहे व स्पर्धा परीक्षेत बसताना कोकणातील विध्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केले पाहिजे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश घडवले यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात बोलताना व्यक्त केले तसेच श्री राजेंद्र फणसे यांनी गरिबीची परवा न करता शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी नावलौकिक वाढवले पाहिजे तसेच श्री अविनाश सोंडकर यांनी शिक्षण घेताना आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात उत्तम काम केल्यास आपल्या नावलौकिक होऊ शकतो सदर सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष विनोद सदानंद चाळके यांनी संस्थेने केलेला सामाजिक कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनीही भावी जीवनात समाजाची जाणीव म्हणून सामाजिक कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले सदर सोहळ्यात विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन उज्वल यशासाठी प्रोत्साहन देण्यात आले यावेळी विशेष म्हणजे स्नेय ज्योती अंध विद्यालयातील अंध विद्यार्थी इयत्ता दहावी मध्ये भव्य यश संपादित केल्यामुळे कुमार नैतिक रूके, कुमारी चैत्राली चोगले व कुमार कुमारी पूजा तुरा यांचा विशेष सन्मान करण्यात आला सदर सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद सदानंद चाळके व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री भालके सर यांनी केले यावेळी काही गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार व्यक्त केले.
सदर सोहळ्यात संस्थेच्या वतीने श्री.मितेशभाई शहा, श्री प्रशांतदादा परब, श्री सचिनदादा मार्गज व सुहास मोरे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *