देशभक्तीचा ध्यास घेणारा योद्धा निवृत्त… सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा सैनिकी सेवेला सलाम!
1 min read

देशभक्तीचा ध्यास घेणारा योद्धा निवृत्त… सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा सैनिकी सेवेला सलाम!

Loading

देशभक्तीचा ध्यास घेणारा योद्धा निवृत्त… सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा सैनिकी सेवेला सलाम!

अमळनेर प्रतिनिधी- नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती मनात बिंबविण्यासाठी सैनिकी शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांच्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी हातभार लावला आहे. सेवानिवृत्तीनंतरही लष्करी अधिकारी घडविण्यासाठी मार्गदर्शन कायम सुरू राहणार असल्याचे मत प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी केले. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील हे लष्करी सेवेतील 29 वर्ष व सैनिकी शाळेतील 11 वर्षे सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त झालेल्या विशेष सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, कविता पाटील, प्राचार्य अनिल पाटील, कमांडंट लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे, ज्येष्ठ शिक्षक बी डी पाटील, एस ए बाविस्कर, नायब सुभेदार भटू पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, सुभेदार ए के पाटील, हवालदार डी डी शिंदे, प्रेमराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी नागराज पाटील यांनी सैनिकी शाळेत केलेल्या कार्याची चित्रफिती द्वारा माहिती दाखवण्यात आली. यासाठी व्हि.डी.पाटील यांनी मेहनत घेतली. उमेश काटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी शाळेच्या वतीने सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा पत्नी कविता पाटील यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.प्रा. सुनील गरुड व अनिल पाटील यांनी सुभेदार मेजर नागराज पाटील यांच्या कार्याचा लेखाजोखा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लष्करी प्रात्यक्षिके करण्यासाठी लागणारे विविध साहित्य निर्मिती, एनडीए मार्गदर्शन कार्यशाळा, सामान्य ज्ञान या विषयासाठी केलेले विशेष मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरले. पर्यायाने अनेक विद्यार्थी मिलिटरी व प्यारा मिलिटरी फोर्स मध्ये कार्यरत झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानेच फ्लाईंग ऑफिसर डॉ. घनश्याम पाटील सारखे उच्च अधिकारी हवाई दलात देशसेवा करीत आहेत. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे व शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डीडी घोडेस्वार यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *