प्रा. रविंद्र माळी यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान
![]()
प्रा. रविंद्र माळी यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘ राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न पुरस्काराने प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना गौरवान्वित करण्यात आले.
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम ( मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्स, भारत सरकार) यांच्या वतीने देण्यात येणारा राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न पुरस्कार प्रा. रविंद्र माळी यांना नुकताच नंदूरबार येथे प्रदान करण्यात आला. 27 जुलै रोजी आयोजित पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. हिनाताई गावित, निवृत्त पोलीस उपअधीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक (नंदूरबार) संजय महाजन, शिक्षणाधिकारी बी. एम रोकडे, फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खान्देश शिक्षण मंडळ संचालित फार्मसी महाविद्यालयात सेवारत प्रा. रविंद्र माळी हे 27 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षक व प्रेरणास्रोत म्हणून विद्यार्थी प्रिय आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय परिषदे, कार्यशाळा व शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेऊन संशोधन व माहितीप्रद शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फार्माकोगनोसी विषयाच्या अभ्यासमंडळावर व भारत सरकारच्या प्राण्यांवरील प्रयोगांवर नियंत्रण व पर्यवेक्षण समितीत प्रा. माळींची निवड करण्यात आली आहे. प्रसंगी समाज रत्न , कृषी रत्न, शिक्षक रत्न व महिला रत्न असे विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सुयोग्य व्यक्तींना वितरीत करण्यात आले.
या पुरस्कारासाठी प्रा. रविंद्र माळी यांचे खा. शि मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल, फार्मसी विभाग चेअरमन मा. योगेश मुंदडे, सर्व मंडळ सदस्य, सचिव प्रा. पराग पाटील, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
क्षत्रिय कांच माळी समाज अमळनेर चे अध्यक्ष मनोहर महाजन, समस्त पंच मंडळ, समाज बांधव व सर्व मित्र परिवारातर्फे सरांचे अभिनंदन करण्यात आले.

