गुणवंतांचा गौरव, समाजाचा अभिमान – संत सावतामाळी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम
1 min read

गुणवंतांचा गौरव, समाजाचा अभिमान – संत सावतामाळी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Loading

गुणवंतांचा गौरव, समाजाचा अभिमान – संत सावतामाळी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
.दि.२७जुलै रोजी, क्षत्रिय काच माळी समाज मढी, अमळनेर येथे श्री.संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर यांच्या कडून विद्यार्थी “गुणगौरव” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी,पदवी,पदवित्तर यश संपादन केलेले विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध शासकीय सेवेत दाखल झालेल्यां विद्यार्थ्यांचा तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रात विविध आघाड्यांवर निवड झालेल्या समाज बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमांचे अध्यक्ष -मा.श्री.डाॅ.मुरलीधर काशिनाथ महाजन, अध्यक्ष -ओंकारेश्वर धर्मशाळा संचालक मंडळ, बऱ्हाणपूर म .प्र.प्रमुख अतिथी मा.श्री.नितिन शंकर सोनवणे, राजपत्रित अधिकारी आॅडनन्स फॅक्टरी भुसावळ,मा.सौ.डाॅ.सोनल प्रसाद महाजन चेडे,DGO,DNB(स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ, अमळनेर,मा.श्री.प्रेमराज जगन्नाथ शेलकर, प्रगतशील शेतकरी लासूर,मा.श्री.सुनिल दयाराम महाजन,कृष्णार्जुन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व मोटिवेशनल स्पिकर, अमळनेर,मा.श्री.मनोहर महाजन सर अध्यक्ष -क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ अमळनेर,मा.सौ.विमलबाई हिंमतराव महाजन अध्यक्षा-क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, अमळनेर,मा.श्री.मोतीलालजी जैन, महवीर एम्पोरियम, अमळनेर,मा.श्री.भगवान बुधा महाजन ,अध्यक्ष-संत सावतामाळी सेवा मंडळ अमळनेर,वरील मान्यवराहस्ते विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह मेडल व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे,ईशस्तवन व स्वागत गीत,सौ.मनिषा महाजन,सौ.रंजना महाजन,सौ.भारती चव्हाण यांनी सादर केले.प्रास्ताविक,प्रा.एस.ओ.माळी तर सुत्रसंचलन श्री.गणेश महाजन सर,प्रा.डाॅ.सुभाष महाजन यांनी केले आभार प्रदर्शन अँड,श्री.सुदाम माळी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महिला मंडळाच्या सर्व भगिनी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ, व समाज बाधव-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *