संविधानामुळेच बहुजनांना, अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला आहे*. *मुकुंद सपकाळे* *संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची निवड*
![]()
*संविधानामुळेच बहुजनांना, अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला आहे*.
*मुकुंद सपकाळे*
*संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची निवड*
जळगांव प्रतिनिधी
प्रस्थापित समाज व्यवस्थेने बहुजन, दलित, अल्पसंख्यांक यांना नाकारलेले माणूसपण, हक्क, अधिकार सर्वार्थाने संविधानानेच मिळवून दिलेले असल्याने संविधानामुळेच बहुजन, दलित आणि अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाल्याचे मत संविधान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संमेलन आयोजन समितीच्या बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार हे होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. तर संविधान संमेलनाची भूमिका डॉ. मिलिंद बागुल यांनी विषद केली. संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खलील देशमुख, सुश्मिता भालेराव, यांनी दिनांक २६ व २७ जुलै रोजी होणाऱ्या संविधान शिबिरा संदर्भात उपस्थितांना माहिती देवून उपस्थितीचे आवाहन केले, डॉ. करीम सालार डॉ. एस. एस. राणे, सुरेश चांगरे, निखिल रांजनेकर, अजय बिऱ्हाडे, राजू सोनवणे, चेतन नन्नवरे, मनोहर गाढे,विकास बिऱ्हाडे,विलास सुरवाडे, डी.एच निकुंभे, एडवोकेट राजेश गोयर, दयाराम पाटील,राजू सवरणे, भैय्या सपकाळे, अनिल सुरडकर, विजयकुमार मौर्य, सुनील सोनवणे, निलेश सोनवणे,दत्तू सोनवणे,अनिल सोनवणे, मंगल बी. पाटील,आधार सपकाळे,भारत सोनवणे यांनी संमेलन यशस्वीतेच्या दृष्टीने अनेकविध सूचना याप्रसंगी केल्यात. बैठकीस संजय सोनवणे, महेंद्र केदारे, राजू सपकाळे, कैलास तायडे, प्रदीप सोनवणे, राजू मोरे, आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार, सुभाष साळुंखे, भीमराव तायडे, मुकुंदा इंगळे,पितांबर अहिरे, संजय बागुल दिलीप सपकाळे, प्रा. के एल.हिरोळे, ललित महिरे, अजय कोचुरे, चेतन तायडे, यांची उपस्थिती होती कवी राहुल तायडे यांच्या संविधानपर गीताने बैठकीला सुरुवात झाली संचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार जगदीश सपकाळे यांनी मानले.

