संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते.-सुरसिंग जाधव
1 min read

संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते.-सुरसिंग जाधव

Loading

संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते.
सुरसिंग जाधव

जळगांव प्रतिनिधी

कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि एकूणच त्याच्या सेवेची असणारी हमी ही संघटन कौशल्यात असून संघटनेच्या बांधणीतच कर्मचाऱ्यांचे यश असते असे मत सूरसिंग जाधव यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष अनिल सुरळकर होते बैठकीचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष सुनील सोनवणे यांनी केले तर जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. टी. सोनवणे यांनी संघटनेची उद्दिष्टे आणि सभासद वाढविण्याचे भूमिका विशद केली याप्रसंगी मार्गदर्शन करताना महासंघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बागुल यांनी कर्तव्य आणि हक्काची हमी ही सतत संघटना आपल्याला देत असते देशाचा एक सजग नागरिक या नात्याने आपली सेवा प्रामाणिकपणे करत असताना आपण पदाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची गरज असून संघटन कौशल्य हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या एकसंघ असणाऱ्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे मत त्यांनी मांडले. अध्यक्ष स्थानावरून कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू आणि कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत असणाऱ्या पदोन्नती, सेवा हमी प्राप्त करून देण्याकरता संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे आपण प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी मांडले. मोहन पालवे किरण खैरे विकास बिऱ्हाडे, अजित चव्हाण यांनी बैठकीत मार्गदर्शन केले हा अभिलाष बागुल, आनंद पगारे, सुमित जाधव, चंद्रशेखर चौधरी, आनंद सुरवाडे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन बापूराव पान पाटील यांनी तर आभार मुकुंद इंगळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *