वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन*
1 min read

वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन*

Loading

*वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन*

दिनांक 19 जुलै अनुदानित आश्रमशाळा वेली येथे नोबेल फाउंडेशन जळगांव यांच्या द्वारे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव यावा व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूने जळगांव येथील नोबेल फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख जयदीप पाटील यांनी वेली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षे मार्फत इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तीन स्तरावर स्पर्धा परीक्षा घेऊन महाराष्ट्रातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना इस्रो संस्थेत भेटीसाठी निवडले जाते. या स्पर्धा परीक्षेसाठी वेली आश्रमशाळेतील एकुण 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
लहान गटातून 11 विद्यार्थी तर मोठ्या गटातून 29 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा घेण्यासाठी पिंजारी सर राजपूत सर ,वसावे सर,के.बी.पावरा सर,टी.जे.पावरा सर यांनी परीक्षेचे आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *