डॉ.अशोक पारधे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान……
![]()
डॉ.अशोक पारधे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान……
जळगांव प्रतिनिधी
जळगाव येथे अठरावे बहिणाबाई-सोपानदेव चौधरी खान्देश स्तरीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात डॉ. अशोक पारधे यांना साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. फुला बागुल यांच्या शुभ हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशोक पारधे हे कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथी इंग्लिश स्कूल जळगाव येथे गेल्या 35 वर्षांपासून अदयापक म्हणून कार्यरत आहे. कवी डॉ. यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल यांचे शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. पारधे यांना आता पर्यत सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उत्कृष्ठ सूत्रसंचालन, निवेदन, करतात. यापूर्वी
‘ कष्टशिवाय फळ नाही ‘ या कवितेचं पोस्टर प्रकाशन मा. जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या शुभ हस्ते संम्पन्न झालेले आहे.
स्वागताध्यक्ष पुष्पा साळवे ,सुप्रसिद्ध साहित्यिक बी एन चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे , डॉ.अरविंद नारखेडे आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, श्री.विष्णूभाऊ भंगाळे ,
अप्पासाहेब निळकंठ गायकवाड ,आयोजक
डॉक्टर विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे ,विजय लुल्ले प्राध्यापिका संध्या महाजन, सुनिता येवले ,मनोहर तेजवानी प्रकाश पाटील ,डॉ. अ. फ. भालेराव या सर्वांच्या उपस्थित हा पुरस्कार सन्मानाने देण्यात आला.

