लहान माळीवाडा येथील माळी समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम अंतीम टप्प्यात !….
![]()
लहान माळीवाडा येथील माळी समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम अंतीम टप्प्यात !….
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळीवाडा यांचे मंगल कार्यालयाचे दुसरा मजलाचा स्लॅब ची विधीव्रत पुजन सुरुवात करण्यात आली असून सदर काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे सात हजार स्क्वेअर फुट पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या या कामाचे गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव गुलाबराव पाटील यांचा शुभ हस्ते व विविध मान्यवराचा उपस्थित भुमीपुजन करण्यात आले व आज दुसरा मजलाचा स्लॅब टाकण्याचा कामास प्रारंभ करण्यात आला.
सदर मंगल कार्यालयचे काम युद्धपातळीवर सुरु असुन साडे पांच हजार स्क्वेअर फुटचे खाली व वरती दोन प्रशस्त हाॅल त्यात विवाह सोहळ्यांसह भोजन व्यवस्था रहाण्याची बसण्याची व्यवस्थेसह किचनहॉल सारख्या मुलभूत समस्यांचा विचार करुन उभारले जात आहे सदर मंगल कार्यालया साठी जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी त्याचा निधीतून पन्नास लाखाचे अनुदान दिले असुन दहा लाखाचा हप्ता प्राप्त झाला आहे त्या अनुषंगाने पंच मंडळाचा वतीने ना.पाटील यांचे आभार मानण्यात आले तर दुसरीकडे तिन कोटी पेक्षा अधिक खर्च असलेल्या ह्या कामा साठी समाजातील दानशूर दात्यांनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन देखील पंच मंडळाने केले आहे
सदर या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन,उपाध्यक्ष शिवाजी देशमुख,जेष्ठ पत्रकार कडू महाजन, माजी उपनगराध्यक्ष विलास महाजन,खजिनदार राजेंद्र महाजन, दिपक महाजन, राजु महाजन,भटुलाल महाजन, दयाराम महाजन, धिरज महाजन, सुधाकर महाजन, चैत्राराम महाजन, साद्या महाजन, सोनु महाजन, गुलाब महाजन, शिपाई गणेश सह आदि उपस्थित होते.

