स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण*
![]()
*स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण*
अमळनेर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर वाळूज महानगर जवळ भांगशीमाता गड येथे व श्री श्री बीज वृक्ष बॅंक यांच्या तर्फे २०० रोपटे वृक्षारोपण व ५० अधिक प्रजाती झाडाच्या बियांचे रोपण करण्यात आले.
हे वृक्षारोपण व बीज रोपण करण्यासाठी श्री श्री बॅक चे अध्यक्ष रत्नाकर मोरे व स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुरलीधर बेडगे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करण्यासाठी मदत केली.
दुर्मिळ बीजचे वृक्षरोपन महानगर परिसर नयनरम्य निसर्गमय बनवूया व झाडे लावा झाडे वाचवा हा नारा देण्यात आला.!!
पर्यावरण पूरक झाडांचे वृक्षारोपण तसेच ५० हून अधिक प्रजातीच्या झाडांच्या बियांचे यशस्वी रोपण झाले. वाळूज महानगरातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मी सर्वांचे मनापासून ऋणी आहे लवकरच साजापूर डोंगर परिसर हा हिरवागार होणार आहे. निसर्गाचा मनमुराद आनंद येथे मिळणार आहे.

